२६ ऑगस्ट 1982 रोजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मीती झाली. भामरागड तालुका हा अति दुर्गम भागात वसलेला असुन येथील जलद विकास होण्याच्या दृष्टीने सन 1993 पासुन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुख्यालय भामरागड जि. गडचिरोली महाराष्ट्र राज्य येथे स्थापना झालेली आहे. भामरागड हे छत्तीसगड राज्याच्या सिमेला लागून आहे.
क्षेत्रफळ :- एटापल्ली तालुक्याचे क्षेत्रफळ 3954.70 चौ.कि.मी. असुन भामरागड तालुक्याचे क्षेत्रफळ 499.77 चौ.कि.मी. इतके आहे.
गावे :- 2011 जनगणने नुसार एटापल्ली तालुक्यात एकुण 197 गावे असुन सर्व गावात वस्ती करुन लोक राहतात. तर भामरागड तालुक्यात एकुण 128 गावे असून 126 गावांमध्ये लोक वस्ती करुन राहतात व 2 गावे अद्याप ओसाड आहेत.
लोकसंख्या :- सन 2011 चे जनगणने नुसार एटापल्ली तालुक्यातील लोकसंख्या 81713 असुन त्यापैकी अनुसुचीत जमातीची एकुण लोकसंख्या 66597 आहे. जी एकुण टक्केवारीत 81.5% आहे. भामरागड तालुक्याची लोकसंख्या 36325 असुन अनुसुचीत जमातीची लोकसंख्या 29459 आहे.जी एकुण टक्केवारीत 81.1% आहे.