जे पिढ्यान पिढ्या वनांमध्ये राहत आहेत परंतु ज्यांच्या हक्कांची नोंद होऊ शकलेली नाही. अशा वननिवासी अनुसूचित जनजाती आणि इतर पारंपारिक वननिवासी यांच्या वन हक्कांना व वन जमिनीवरील त्यांच्या भोगवट्यास मान्यता देण्यासाठी आणि असे वन हक्क व भोगवटा त्यांच्याकडे निहित करण्यासाठी अशा आवश्यक असलेल्या पुराव्यांचे स्वरुप याकरिता तरतूद करण्यासाठी हा अधिनियम आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासीवर झालेल्या ऐतिहासिक अन्याय दुर करण्यासाठी वनहक्क कायदाची तरतूद करण्यात आली.
अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम 2006 नियम 2008 व सुधारणा नियम 2012 अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड जि. गडचिरोली च्या कार्यक्षेत्रात भामरागड व एटापल्ली हे दोन तालुके येतात. या दोन तालुक्यातील खालीलप्रमाणे सामुहिक वनहक्क दावे मंजुर करण्यात आलेले आहेत.
| अ.क्र. | तालुक्याचे नाव | मंजुर सामुहिक वनहक्क दावे |
|---|---|---|
| 1 | भामरागड | 161 |
| 2 | एटापल्ली | 244 |
| एकुण | 405 | |
भामरागड तालुक्यात एकुण 128 गावे व एटापल्ली तालुक्यात एकुण 197 गावे आहेत. सदर गावे लक्षात घेता सामुहिक वनहक्क दावे मंजुर करण्याचे प्रमाणे हे 100% दिसुन येत आहे. 100% सामुहिक वनहक्क दावे मंजुर करण्याची कदाचित देशभरातील पहिलीच घटना असावी.