यशोगाथा
जागतिक महिला दिनी सक्षम आणि कणखर मातृत्वाला सलाम
Date : 08-03-2022
आदिवासी भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा जारेगुडा गावातील नाव चालवून आजची स्त्री कुणावरही विसंबून न राहता स्वतःचे काम स्वतः करु शकते या ओळींना सार्थ करुन दाखविणाऱ्या आदिवासी माऊलींचे मा. शुभम गुप्ता, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड यांच्या वतीने साडीचोळी, श्रीफळ देऊन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्ती मध्ये फुला साधु पुंगाटी, जैनी इरपा पोदाळी, रेखा रैनू पुंगाटी, कतरी दोगे वेळदा, माली बंडे सिडामी, कोपा डोके मडावी या कणखर, निडर व सक्षम आदिवासी भगिनींचा समावेश होता.






